Tuesday 25 November 2014

फक्त एकदा........

फक्त एकदा........
मला तु भेटशील
भेटून माझ्या प्रेमाचा
स्वीकार तू करशील

फक्त एकदा......
मला तू भेटशील
भेटून माझा हात तू
तूझ्या हाती घेशील

फक्त एकदा.....
मला तू भेटशील
भेटून मला तू
तुझ्या मिठीत घेशील

फक्त एकदा.....
मला तू भेटशील
भेटून आयुष्याच्या वळणावर कायम
मी तूझीच साथ देईन असं म्हणशील

फक्त एकदा....
मला तू भेटशील
मी होतो तुझा ,आहे तुझा
राहणार तुझाच कायम असं म्हणशील

फक्त एकदा ...
मला तू भेटशील....

Monday 8 September 2014

तिचं माझ भांडण


ती: तू माझ्याशी भांडत नको जाऊ बरं ..
तो: ते आपल्याला जमणार नाही... तेवढं सोडून बोल.. मी तर भांडणार...
ती: किती नालायक आहेस...
काय मिळतं तुला माझ्याशी भांडून...
तो: हो, नालायक तर आहेच...
अगं ते गाणं नाही ऐकलयेस का...
"कोई हसीना जब रूठ जाती है तो और भी हसीन हो जाती है"...
ती: हो ऐकलय...
तो: पण तसं काहीही नाहीये ....
ती: (वैतागून, त्याच्या खांद्यावर ४-५ चापटा मारत)... जा बाबा.. जा ...
तो: अरे हो हो...
बरं ठीक आहे..
आता ऐक...
मी तुझ्याशी भांडतो...
भांडतांना माझ्यावर जो हक्क दाखवतेस ना.. त्यासाठी...
मी तुझ्याशी भांडतो...
तुझे, "मी आहे म्हणून सहन करतीये" हे शब्द पेलण्यासाठी...
मी तुझ्याशी भांडतो...
"आजपासून बिलकुल बोलू नकोस माझ्याशी" हे वाक्य म्हणतांना तुझा बिथरलेला आवाज ऐकण्यासाठी...
मी तुझ्याशी भांडतो...
चेहऱ्यावर राग असतांना देखील एका अनामिक ओढीने माझ्याकडे बघणाऱ्या त्या डोळ्यांसाठी...
अन
मी तुझ्याशी भांडतो...
भांडण संपल्यावर, तू मारलेल्या घट्ट मिठीत घालवता येणाऱ्या त्या अविस्मरणीय 'क्षणांसाठी'

Thursday 17 July 2014

असतात काही नाती अशी

असतात काही नाती अशी
शब्दात कधी नसांगता येणारी....
असतात काही नाती अशी
कळून सुधा कधी नकळणारी....
असतात काही नाती अशी
फुलसुकल्यावर हि सुगंध सोडून
जाणारी....
असतात काही नाती अशी
नविसरता आठवणीत राहणारी....
असतात काही नाती अशी
अमृता सारखा गोडवा जपणारी....
असतात काही नाती अशी
दुख विसरुनी प्रेम
शिकवणारी...